शिक्षणमहर्षी डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला
शिक्षणमहर्षी डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचा संदेश
! जय भगवान !
शेठ टी. जे. एजुकेशन सोसायटी, ठाणे या संस्थेला आपल्यासारख्या शिक्षणप्रेमी जनांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपले मनःपूर्वक आभार ! आपणास माहित असेलच की एकविसाव्या शतकात आपण प्रवेश केला आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये वेगाने बदल घडत आहेत. उच्च शिक्षणात आमुलाग्र बदल होत आहेत. देशाची भावी पिढी उच्चशिक्षित करण्यात आम्ही खारीचा वाट उचलत आहोत.याचा आम्हाला सार्थ अभिमान आह्रे. तसेच उच्चशिक्षण कालाभिमुख करण्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्थेमार्फत सक्रीय प्रयत्न होत आहेत. नियमित अभ्यासक्रमांबरोबर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना अत्याधुनिक सेवा पुरवण्याचे कामही ही संस्था समर्थपणे करत आहे.े.
आपल्या महाविद्यालयातील विद्य्रार्थी केवळ शैक्षणिकच नाही तर कला आणि क्रिडा या क्षेत्रातही अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. त्यांच्या ह्या कामगिरीसाठी संस्थेतील सर्व स्तरावरील अधिकारी,शिक्षक वर्ग आणि कर्मचारी वर्ग सतत प्रयत्नशील आहेत. या परिश्रमाच उत्तम फळ विद्यार्थ्यांच्या मिळणाऱ्या यशाद्वारे मिळण्याचे आम्हाला समाधान वाटते.
या महाविद्यालयात मुख्यत्वे शिस्तबध्द वातावरण राखले जाते आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळते. आम्ही जाणतो कि महाविद्यालयातील शिक्षणाचा त्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होत असतो . शिक्षण पूर्ण केल्यानंतर नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयात समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे वेळोवेळी पाठपुरावा केला जातो. त्याच बरोबर नोकरी करत असणाऱ्या आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासक्रमाबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे संचलित विविध अभ्यासक्रमही या संस्थेमार्फत यशस्वीरीत्या चालवले जात आहेत..
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी महाविद्यालयात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रिडा विषयक अनेक कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते. विद्यार्थ्यांची समाजाप्रती निष्ठा आणि जाणीव वाढावी यासाठी ऐस.एस.एस., डि.एल.एल.ई यासारख्या समित्या अनेक उपक्रम राबवतात. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयातील विध्यार्थी हा उत्तम नागरीक आणि संवेदनशील व्यक्ती व्हावा यासाठी त्यांच्या मनावरील ताण किंवा त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचं निराकरण करण्यासाठी आमचे प्राध्यापक वर्ग प्रयत्न करीत असतात त्यासाठी पालक म्हणून आपलाही सक्रीय सहभाग महत्वाचा आहे.यांना आवाहन करतो.
आमच्या संस्थेच्यामार्फत लावलेल्या रोपट्याचे रुपांतर आज वटवृक्षात झाले आहे याचे आम्हाला समाधान आहे. आमच्या संस्थेच्या महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरही अनेक विद्याशाखा आहेत शाळा व महाविद्यालयामार्फत हा शिक्षणाचा यज्ञ अविरतपणे सुरु आहे. यापुढेही या क्षेत्रात प्रयोगशील व कार्यरत राहून ह्यासाठी आपले पाठबळ व मार्गदर्शन आम्हास लाभो ही प्रार्थना आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी आम्हातर्फे खूप शुभेच्छा ! एकदा जागवू या.
- समाजरत्न डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावालाका””